नेवासा प्रतिनिधी-
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव/सुरेशनगर या ठिकाणी अजाण बाहू योगीराज प्रल्हाद गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य भास्करगिरी महाराज,महंत सुनीलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने, महंत रमेशानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.६/५/२०२२ रोजी संत पूजन व दर्शन सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी गुरुवर्य भास्करगिरी महाराज,नामदार शंकरराव गडाख पाटील(मृद,व जलसंधारण मंत्री,म.रा) महान तपस्वी शिवानंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र मंजूर,कोपरगाव,श्री महंत देवेंद्रगिरीजी महाराज-गुजरात,श्री महंत वेदव्यासपुरीजी महाराज-गुजरात,श्री महंत इंद्रभारती महाराज- गिरनार मंडल, श्री महंत प्रवक्ता सेक्रेटरी नारायनगिरी महाराज-उत्तरप्रदेश गजिया बाद, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सायंकाळी संपन्न होणार आहे,
या कार्यक्रमासाठी अनिल साळुंके,श्री रामराव सुरोशे,साईनाथ मित्र मंडळ, शिवशंभो ऍग्रो सर्व्हिस चे पांडुरंग पा. उभेदळ,सुरेशराव उभेदळ , आसाराम कराळे, श्री अनिल पिसाळ,प्रसाद गडकर,जालिंदर एकनाथ साळुंके,बाळासाहेब पा.साळुंके,रामदेव बाबा स्टील के डी पटेल,जनार्दन पटारे,विठ्ल राव पाषाण,आघाव साहेब,अरुण पा.उंडे,सोपान पंडित, अक्षदा कृषी सेवा केंद्र,मुळाई दूध संकलन केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.
तरी या कार्यक्रमाचे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ ,भजनी मंडळ,भाविक भक्तांनी लाभ घ्यावा हि विनंती स्वयंभू त्रिवेणीश्वर चे मठाधिपती महंत रमेशानंदगिरी महाराज यांनी केली