अहमदनगर
खोकर येथील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्या वर्षी ही ऊस क्षेत्राला आग लागून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…..
अहमदनगर प्रतिनिधी। जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे महावितरण ने वेळीच दखल न घेतल्या मुळे दुसऱ्या वर्षी ही ऊस क्षेत्राला आग लागून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे*.
खोकर टाकळीभान रोड लगत श्री राजेंद्र सोपानराव पटारे यांचा गट नं. 16 मधील ऊस पिकाला शेतातील विज वाहक खांबावर शॉर्टसर्किट होऊन आग लागली.
मागील वर्षी ही याच ऊसाला या ठिकाणीच शाॅर्टसर्कीट होऊन आग लागली होती.
महावितरण ने वेळीच दखल न घेतल्या ने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.