दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरण पूरक श्री गणेशाची स्थापना.

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरण पूरक श्री गणेशाची स्थापना.

राहुरी वार्ताहर तुक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये आज पर्यावरणपूरक श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. प्राचार्य जगदीश मुसमाडे सरांनी सहपत्नीक आरती केली.
गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज ओळखून तक्षज्ञच्या विद्यार्थ्यांचा एक आगळा वेगळा गणपती महोत्सव साजरा करण्याचे ठरवले .एक बाप्पा एक झाड असा सामाजिक संदेश देणारा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवला. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्येच एका फळ रोपाभोवती युको फ्रेडली गणपती तयार करून त्याची स्थापना केली. एवढेच नाही तर एक आगळे वेगळे विसर्जन करणार आहे. नदीला किंवा कुठे पाणी प्रदूषित करण्यापेक्षा व मूर्तीची विटंबना न व्हावी या हेतूने खड्डा खांदून त्यात पाणी टाकून ते रोप लावून त्याचे संगोपन करण्याची एक वेगळीच मोहीम राबविण्यात येत आहे. या उत्सवातून संदेश म्हणजे पाण्याचे प्रदूषण टाळा, मूर्तीची होणारी विटंबना टाळा व जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी झाडे लावा. असा संदेश देणारा गणपती महोत्सवाचे कौतुक आरडगाव नगरीतील श्री. नानासाहेब म्हसे व सर्व गावकरी व पंचक्रोशातील नागरिक भरभरून करत आहे.

त्यावेळेस उपस्थित कॉलेजचे प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे सर, प्रा .राहुल बोरुडे, प्रा.अफ्रोज सय्यद, प्रा. सागर वाघ, प्रा संतोष आनाप, प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा. गौरी म्हसे ,प्रा. सोनाली शिरोळे, प्रा .अश्विनी खिलारी, प्रा. स्वाती कोबरने, प्रा वैष्णवी शिरसाठ शिक्षकेतर कर्मचारी हेड क्लार्क सलीम पठाण ,आकाश बोर्डे ,अमोल पवार सर्व उपस्थित होते.

र्यावरण पूरक गणपती समवेत सर्व सहभागी विद्यार्थी व सर्व प्राध्यापक रुंद
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे