अहमदनगर
कारेगाव येथे नव्याने रुजू झालेले तलाठी यांचा ग्रामपंचायत वतिने सत्कार….
वांगी प्रतिनिधी।श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील तलाठी यांची बदली झाल्या मुळे शेतकरी वर्गाला तलाठी कार्यालयातील कामाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता परंतु कारेगाव सजा असलेल्या तलाठी कर्यालयाला नुतन तलाठी आशोक चितळकर हे हजर झाल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले त्याच बरोबर नवीन तलाठी हजर झाल्यामुळे कारेगाव ग्रामपंचायत च्या वतीने कामगार तलाठी चितळकर यांचा सत्कार उपसरपंच विजय शिवराम पठारे तसेच सरपंच आनंदा वाघ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी चेअरमन खरेदी विक्री संघ लक्ष्मण भवार बाजीराव ठोंबरे अमोल पटारे आबा जाधव गोरख बारसे सुनील बागुल राहुल गायकवाड प्रदीप कांबळे हे उपस्थित होते.