दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

धर्माबाद जवळ हरिणाला भेटले जीवनदान – प्रहार चे तालुकाध्यक्ष दिगांबर पा. सावळे आले धावून….

दिनेश दारमोड प्रतिनिधी

धर्माबाद। धर्माबाद शहरानजिक असलेले चंद्रलोक धाब्याजवळ धर्माबाद बिलोली मार्गांवर एका हरिणाच्या मागे काही कुत्रे लागले होते, त्या हरिणास जीवनदान देण्याचे काम काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले असून यात प्रामुख्याने प्रहार चे धर्माबाद तालुकाध्यक्ष दिगांबर पा. सावळे यांच्या तत्परतेने त्या हरीनाचे प्राण वाचले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि धर्माबाद शहरानजिक धर्माबाद बिलोली मार्गांवर चंद्रलोक धाब्यानजीक एका हरणाच्या मागे काही भटके कुत्रे लागले होते, धर्माबाद तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जमीन ओलसर असल्यामुळे सदरील हरिणाला गाठून त्या भटक्या कुत्र्यांनी अनेक ठिकाणी चावा घेतला होता,तेथे येणाऱ्या अन जाणाऱ्या काही प्रवासाच्या लक्षात ही बाब आली अन त्यांनी सदरील बाब प्रहारचे तालुकाध्यक्ष दिगांबर पा. सावळे सांगितली, त्यांनी सदरील बाब वन उपविभाग धर्माबाद च्या कर्मचाऱ्यांना सांगून, तसेच पशुधन विकास कार्यालयाचे कर्मचारी यांना कळवले. सदरील कर्मचारी ताबडतोब जागेवर आले अन त्यांनी त्या जखमी हरिणाचे प्रथमोचार केले, त्या हरिणास प्राथमिक उपचार करून सदरील हरिणास धर्माबाद पासून 5 किमी अंतरावर असलेल्या वन विभागाच्या जागी सोडण्यात आले उपरोक्त विषयांत प्रसंगावधान राखत प्रहार चे तालुका अध्यक्ष दीगाम्बर पाटील सावळे यांचे सहकारी ,वनविभागाचे कर्मचारी व पशुधन विभागाचे कर्मचारी यांनी हरिणास जीवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे