अहमदनगर
पोक्सो व विनयभंगातील आरोपीची निर्दोष मुक्तता
प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )
अहमदनगर : अहमदनगर एम आय डी सी चेतना कॉलनी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एम आय डी सी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर आय 92/2019 दाखल गुन्हा आय पि सी 354 ( A ) , 341 , 323 , 504 व पोक्सो 7, 8 , 11 , 12 मधील आरोपीची विशेष सत्र न्यायालय अहमदनगर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे सदर केसमधे सरकार पक्षाच्या वतीने एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले आरोपी विरुद्ध पुरावा न आल्याने आरोपीची मा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली सदरच्या केसमध्ये आरोपीच्या वतीने ॲड प्रविण पालवे यांनी कामकाज पाहिले व त्यांना ॲड डी वाय जंगले यांनी सहकार्य केले