आतकुर शिवारात ऊसाच्या शेतीला आग लागून लाखाचे नुकसान….!
धर्माबाद तालुका प्रतिनिधी।मौजे आतकुर येथील ऊसाला आग लागून शेतकऱ्यांचे दोन एकर ऊसाच्या शेतीला आग लागून ऊस जळून खाक झाल्याची घटना दिनांक १३ रोजी घडली आहे. शेतकरी चंद्राबाई मदनूरकर यांच्या शेतीचा गट नं.२८७ मधील मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे .शेतात 298 आर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. उसाचे पाचट वाळल्याने १३ ऑक्टोबर रोजी उभ्या पिकास आग लागली. बघता बघता आगीने
रौद्ररूप धारण केले. यावेळी संबंधित शेतमालक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला;परंतु तोवर संपूर्ण पीक आगीचे भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेत त्यांचा दोन एकरवरील ऊस जळून भस्मसात झाला. या घटनेची माहिती पंचायत समितीचे सभापती मारोती पाटील कागेरु व अशोक दारमोड यांनी फोन करून कृषीअधिकारी सुरेंद्र पवार, व तलाटी बी.बी रेड्डी,नाईकवाडे व्ही.एन यांना सांगण्यात आले असता त्याच वेळी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे .
शेतकरी सौ.चंद्राबाई मदनूरकर यांचे अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज होत आहे. संबंधित शेतकर्यास शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.