तालुका पत्रकार सेवा संघटनेच्या सभेत अरुणोदय पुस्तकाचे पूनःप्रकाशन…
अजय होळकर। जिल्हा प्रतिनिधी
रायगड प्रतिनिधी।माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाची मासिक सभा सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
रायगड भुषण जेष्ठ पत्रकार अरुण पवार यांनी माणगांव मधिल विविध सामाजिक विषयांवर आपल्या लेखनीतून बातम्यां द्वारे न्याय देण्याचा प्रयत्न केला व अनेक वर्षाच्या पत्रकारितेची कायम आठवण राहावी यासाठी पत्नीचे खास आग्रहास्तव आपल्या संग्रहित बातम्यांचे ‘अरुणोदय’ हे पुस्तक छापले.
या पुस्तकापासुन प्रेरणा घेऊन नवोदित पत्रकारांना शिकता यावे या उद्देशाने माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ अध्यक्ष रविंद्र कुवेसकर यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे पुनःप्रकाशन करण्याचा मानस व्यक्त केला. सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत रायगड भुषण जेष्ठ पत्रकार, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, लेखक, कवि प्राध्या. जयपाल पाटील यांच्या शुभहस्ते त्याचे प्रकाशन
याप्रसंगी संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा देखिल करण्यात आली असुन पत्रकारांसाठी लवकरच एक आरोग्य शिबीर तसेच शेती विषयक अभ्यास दौरा आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला. याविषयी जयपाल पाटील यांनी आपल्या पत्रकारांनी नावलौकीक करावा तसेच अरुण पवार यांचे या पुस्तकाची शासनाचे साहित्य विभागाने नोंद घ्यावी याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या सभेत माणगांवकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाठपूरावा करण्याचा संकल्प देखिल करण्यात आला.