शिवसेनेच्या जागा 5 पण आल्या नसत्या….चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं……
एम बी कवठेकर प्रतिनिधी
नांदेड : देगलूर बिलोली मतदार संघाचे विधान सभेचे काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मतदारसंघ आता पोटनिवडणुकीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झालीय.असे चिञ देगलूरच्या भाजपच्या सभेमधुन दिसुन आले आहे भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना मैदानात उतरवलं आहे. साबणे यांनी आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर झालेल्या भाजप मेळाव्यात चंद्रकातं पाटील यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच. असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांणी व्यक्त केला आहे… मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे.चांगल यश मिळाल होत माञ आम्हाला 20 आमदार कमी पडले सता स्थापणेला..आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला..
आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला सभेमध्ये ङीवचल देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यास भाजपने पहिला नंबर घेतलाय. आपण प्रचारातही बाजी मारली आहे. 7 तारखेला ते एक अर्ज भरतील. 8 तारखेला मोठी रॅली काढून सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल. अशी माहिती सांगितले…!!