दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेड

कंधार येथे महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन…

कंधार प्रतिनिधी: एम. जे. सय्यद

कंधार प्रतिनिधी | येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.

[Groww – Online Demat, Trading and Direct Mutual Fund Investment in India]

या महाआरोग्य मेळाव्यात बालरोग, अस्थीरोग, स्त्रीरोग, किडनी विकार, मधुमेह, कान, नाक व घसा तपासणी, दंताचे विकार, पोटाचे विकार, मोतीबिंदू, अपेंडिक्स, हर्निया, थायरॉईड, अवयव दान, ब्लड डोनेशन, गरोदर स्त्रियांचे विकार, अंडवृधी ऑपरेशन आदी आजारांच्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच रुग्णांना हेल्थ आयडी, गोल्ड कार्ड, प्रधानमंत्री कार्ड देण्यात येणार आहेत.

या महाआरोग्य मेळाव्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसेकर, सामान्य रुग्णालय नांदेडचे आरएमओ डॉ. हनुमंत पाटील आदींसह तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. या महाआरोग्य मेळाव्याचा कंधार शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे