दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

हादगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारे 122 कोटी रुपयांचा अनुदान..

प्रतिनिधी अवधूत खाडे.

प्रतिनिधी अवधूत खाडे 9130708500

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यंदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने NDRF मधून नुकसाभरपाई 717 कोटी रुपये व पिकविमा परतावा 25 % अग्रिम रक्कम मनून 410 कोटीचा परतावा मिळणार आहे, त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 1131 कोटी रुपयांच्यावर रक्कम पिकविमा व राज्य सरकारच्या नुकसाभरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हदगाव तालुक्यात 76 कोटी NDRF मधून राज्य सरकारने नुकसाभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना दिली असून पीकविमा 25 टक्के आगाऊ परतावा 46 कोटी रुपये मिळणार आहेत, तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून NDRF मधून व पिकविम्याच्या 25% आगाऊ परताव्याची रक्कम मिळून 122 कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे..

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसान भरपाईची आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी भरघोस मदत नांदेड जिल्ह्याला मिळवून दिली आहे.
यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली आहे, ती मदत नक्कीच त्यांना दिलासा देण्यासाठी असेल, जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पिकविमा व नुकसानभरपाईची रक्कम मिळनार आहे…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब,कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे जिल्ह्यातील व हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून आभार,राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,खासदार हेमंतभाऊ पाटील,आमदार राम पाटील रातोळीकर,भीमराव केराम,राजेश पवार,बालाजीराव कल्याणकर,तुषार राठोड यांनी सुद्धा विशेष प्रयत्न केले त्यामुळेच मराठवाड्यात सगळ्यात जास्त नुकसाभरपाईची रक्कम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे,तसेच 25 टक्के आगावू पिकविमा परतावा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पिकविमा कंपनीकडे सतत पाठपुरावा करणारे जिल्हा प्रशासनातील नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचेही आभार …

भागवत देवसरकर
प्रदेशाध्यक्ष
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे