दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अलिबाग पोलिसठाण्यात हजेरी

प्रातिनिधी-हर्षद यरवलकर

रायगड प्रतिनिधी।मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय लघु, सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे सोमवारी अलिबाग येथे पोलिसठाण्यात हजर झाले.
महाड न्यायालयाने राणे यांना जामीन देतांना ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर या दोन तारखांना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रकृती ठिक नसल्यामुळे ते ३० ऑगस्टला अलिबागला हजर राहू शकले नव्हते. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते अलिबाग येथे दाखल झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांनी हजेरी लावली. यावेळी पनवेलचे आमदार व बीजेपी चे रायगड जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत ठाकूर, माजी आमदार श्री शाम सावंत आणि जिल्हाध्यक्ष श्री महेश मोहीते उपस्थित होते. 45 मिनीटांच्या चौकशी नंतर पोलीस अधिक्षक कार्यालयातून बाहेर पडले.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी येथे आलो होते. मी कुठलाही जबाब यावेळी नोंदवला नाही आहे. पोलिसांनी यावेळी मला चांगले सहकार्य केले अशी प्रतिक्रिया देखील राणे यांनी यानंतर पत्रकारांशी बोलतांना दिली. तर न्यायालयाने जामिनावर देतांना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांन समोर हजर ज़ालो होतो असही राणे बोलले, तसेच ज्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते ती उत्तर राणे साहेबांनी दिली आहेत, त्यामुळे या प्रकरणात त्यांची चौकशी आता पूर्ण झाली असल्याचे राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी यावेळी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे