दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

हाफ चिकन फ्राईड राईस महागात, चायनीज खाल्ल्याने विषबाधा, 6 मुलं रुग्णालयात

प्रातिनिधि-हर्षद तुकाराम यरवलकर

रायगड : रस्त्यावरील चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार उरण शहरात समोर आला आहे. गाडीवरील चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत उरण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.उरणमधील एन आय हायस्कूलजवळ हे चायनीज सेंटर आहे. या चायनीज सेंटरवरुन तक्रारदाराने 5 हाफ चिकन फ्राईड राईस पार्सल नेले होते. मात्र हा राईस खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला. कुटुंबातील सगळ्यांनाच उलट्या आणि पोटाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने, अनर्थ टळला.चायनीज खाल्ल्यानेच हा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चायनीज सेंटरच्या मालकावर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.दरम्यान, रायगड जिल्ह्यातील उरणसह परिसरातील बेकायदा चायनीज सेंटरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. चिकनसह विविध प्रकारच्या डिश इथे उघड्यावर विकलं जातं. मात्र त्यांना कोणतीही परवानगी नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कमी प्रतिचा भाजीपाला, चिकन वापरुन नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे