महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी शेवगाव शहर व तालुका आक्रमक…..
प्रतिनिधी।शामराव काळपूंड
शेवगाव प्रतिनिधी।महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी शेवगाव शहर व तालुका आक्रमक झाला सकाळी. 8 वाजल्या पासुन रस्त्यावर उतरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या कडून करण्यात आले होते. या वेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. शेवगाव शहरा व तालुक्यात सर्व बंदची हाक देण्यात आली असून बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली होती. लखमीपुर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि याच बंदला यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन दुकान बंद करण्याच आव्हान करण्यात आले. महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी गांधी गिरी मार्ग ने रस्त्यावर आले. कार्यक्रमांमध्ये काँग्रेस सेवादलाचे जिल्हा सेक्रेटरी समीर काझी. मागासवर्गीय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तुजारे. इंडियन काँग्रेस ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष जमिर शेख शेवगाव. तालुका काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष असिफ काझी. शेवगाव सेनादलाच्या महिला तालुका अध्यक्ष शाहेदा बी शेख. सेवादल सदस्य निसार भाई शेख. शेवगाव दहिगाव गट प्रमुख गोविंद शेळके भातकुडगाव गट बाळासाहेब काळपूंड. हदगाव गटप्रमुख किरण राजपूत चापडगाव गटप्रमुख रामहरी तेलोरे. आखेगाव गटप्रमुख विष्णू गाडे. प्रकाश बाप्पू भोसले. दसपुते. इमरान शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण पाटील लांडे. संजू भाऊ फडके. संजू भाऊ कोळगे. काका भाऊ नरवडे. दिलीप भाऊ लांडे पाटील. कमलेश लांडगे. समीर शेख. ताहीर भाई पटेल. शिवसेनेचे अविनाश मगर. डाॅ. विजय साळवे. काटे सर. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नागरे. सुभाष लांडे पाटील. व काँग्रेस कमिटी शेवगाव इत्यादी कार्यकर्ते या बंद मध्ये सामील झाले होते.