दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेड

नांदेड येथील धम्म मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कंधार प्रतिनिधी(एम.जे.सय्यद)

कंधार तालुका प्रतिनिधी(एम.जे.सय्यद) :-

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने शनिवार दि.5 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल तालुका शाखा कंधार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्मदीक्षा देऊन महान धम्मक्रांती केली त्यामुळे बौद्धांना प्रतिष्ठेने जगण्याची संधी प्राप्त झाली. बौद्धांचा दर्जा,अधिकार,संरक्षण आणि बौद्धांच्या प्रगतीसाठी आवश्यक असणार्या सवलती त्याच प्रमाणे धम्म दिक्षेसाठी धम्म स्वातंत्र्य अबाधित रहाणे यासह अनेक बाबीवर विचार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने भव्य धम्म मेळावा शनिवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे आयोजित केला आहे.या भव्य धम्म मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार,श्रध्देय, ॲड. माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. भिमराव यशवंतराव आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत.

      या धम्म मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय चेअरमन डॉ.हरीश रावलिया, कॅप्टन प्रवीण निखाडे यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदिश गवई, एस. के.भंडारे, सचिव एस. एस. वानखडे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, सचिव संबोधी सोनकांबळे, दैवशाला गायकवाड,धम्मदेशना पुज्य भदन्त बी.संघपालजी थेरो, कार्यक्रमाध्यक्ष डॉ. यशवंत चावरे, स्वागताध्यक्ष पी. एम. वाघमारे,  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या भव्य धम्म मेळाव्यास कंधार तालुक्यातील बौद्ध उपासक,उपसिका आणि आंबेडकरी अनुयायांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे,सरचिटणीस एन. एन. कांबळे, कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे, शहराध्यक्ष निलेश गायकवाड,समता सैनिक दलाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनकांबळे,सी.डी.ऑफिसर संतोष दुंडे आदींनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे