धर्माबाद। देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक च्या ऐन तोंडावर धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांची देगलूर येथे बदली झाल्यामुळे धर्माबाद तालुक्यातील पोलिस निरीक्षकाचे पद दबंग अधिकारी शिवप्रसाद कत्ते यांची नियुक्ती करण्यात आली.
अत्यंत शिस्तीचा दमदार पोलीस अधिकारी म्हणून सुपरिचित असलेल्या शिवप्रसाद कत्ते त्यांनी तालुक्यातील होत असलेल्या अवैधदारू विक्री व मटका चालकावर धाड टाकून अवैध पद्धतीने चालणाऱ्या मटका व अवैध धंदे करणार्या वर कारवाई करून चांगला चोप दिला.
काल केलेल्या कार्यवाहीत गुन्हा कृमांक 232/21नुसार कलम 12 अ अन्वये व 233/21 नुसार कलम 65 आ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अत्यंत शिस्तीचा आणि कडक अधिकारी पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलिस निरीक्षक झाल्यामुळे तालुक्यात अवैध धंदे करण्याचा मानस करण्याचे धाडस कोणीच करत नसल्याचे सध्या चित्र दिसत आहे.
आगामी काळात धर्माबाद शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा बसवण्यासाठी सुद्धा लवकरच पावले उचलली जातील असे वाहतूक शाखेकडून समजते.
परिवहन मंडळाकडे नोंदणी न केलेले अनेक वाहने यांनी जप्त केली असून आता ती आरटीओ अधिकाऱ्याकडे नांदेडला पाठवण्यात येत आहेत. शहरात पहिल्यांदाच गाडी वर नंबर प्लेट ,लायसन्स पोलीसांकडून तपासल्या जात असल्यामुळे नवीन अठरा वर्षाखालील युवकांच्या हातात गाडी देण्याचे धाडस पालक करीत नाहीत .
नोंदणीकृत नाहीत किंवा नंबर प्लेट्स टाकलेल्या नाहीत अशा गाड्या अचानक भूमिगत झाल्याचे हे चित्र पाहावयास मिळत आहे.
एकंदरीत एक धाडसी अधिकाऱ्यास त्याचे पूर्ण अधिकार दिल्यास वाहतूक वळण व अवैध धंद्यांना चाप बसू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण सध्या धर्माबाद मधल्या प्रभारी पदावर असलेल्या पोलीस निरीक्षकाच्या कामाकडे पाहिल्यानंतर लक्षात येत आहे.