दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

महिलेसमवेतच्या फोटोवरून ब्लॅकमेलिंग….!अखेर कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या… जिल्ह्यातील घटना

शेवगाव प्रतिनिधी। शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील 55 वर्षीय शेतकर्‍याने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.15) रात्री घडली.हा प्रकार एका महिलेसमवेतच्या फोटोवरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या प्रकारातून झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संभाजी साहेबराव खरड असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी भाऊराव उर्फ मधुकर पोपट वाघमारे, शरद अण्णा वाघमारे, कैलास रतन वाघमारे (सर्व रा.देवटाकळी) या तिघा विरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत त्याचा मुलगा महेश खरड यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, संभाजी खरड यांना मागील तीन महिन्यापासून त्यांचे एका महिलेबरोबर एकत्र काढलेले फोटो दाखवून त्यांना वारंवार ब्लकमेल करून पैशाची मागणी केली जात होती.त्यांनी संशयित तिघांना काही पैसे दिले. व यापुढे माझी बदनामी करू नका असे सांगून प्रकरण थांबविण्यास सांगितले. मात्र त्यानंतर ही पैशांची मागणी सुरू राहिली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती.15 ऑक्टोंबरला दुपारी 1 च्या संशयितांनी त्यांच्या घरी जावून कुटुंबियांसमोर पैशांची मागणी करून पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली.त्यातूनच त्यांनी घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेवगाव पोलिसांनी संशयित तिघा विरुद्ध भादवी कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे