तडका

कल्याण मध्ये वन विभागाने टाकला छापा वन्यजीव तस्करी करताना महिलेला अटक…

रायगड प्रातिनिधि-हर्षद यरवलकर

कल्याण प्रतिनिधी। कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने छापा टाकला. यावेळी 250 इंद्रजाल (काळा समुद्री शेवाळ) आणि 80 जोडी घोरपडीचे अवयव आढळले. वन विभागाने सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वनविभागाकडून वास्तू सल्लागार महिला गीता जाखोटिया, तिच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना अटक केली आहे. या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयात का आणल्या? याचा तपास सुरु असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय आहे ?
कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत असलेल्या गीता जखोटिया या महिलेच्या वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेली इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो विभागीय उपसंचालक योगेश वारकड, गजेंद्र हिरे, आणि वन विभागाचे आर एन चन्ने यांच्या पथकाने वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव, तिघांना बेड्या,कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने छापा टाकला. वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव, तिघांना बेड्या, कल्याणमध्ये वनविभागाची मोठी करवाई केली आहे.
*काळी जादूसाठी इंद्रजाल, घोरपडीच्या अवयवांचा वापर*
दरम्यान, इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुख-शांती, चांगलं आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते अशी अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जात असून काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तर आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात. मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा 1972 अन्वये मज्जाव करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे