दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

हंडीनिमगाव जी.प.प्रा.शाळे मध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

बाळासाहेब पिसाळ

नेवासा -प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.
सर्व पालकवर्ग नवीन दाखलपात्र विद्यार्थी, गावकरी,तसेच बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री नजन साहेब,केंद्रातील उपस्थित सर्व शिक्षकवर्ग,गावातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,या सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली, नवीन दाखल पात्र विद्यार्थ्यांची सजवलेल्या गाडी बैला मधून गावातून मिरवणूक काढण्यात आली, शासन परिपत्रकाप्रमाणे यावर्षी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळा पूर्व तयारी मेळावा कशासाठी ? दोन वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असल्यामुळे शाळा बन्द होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे भरपूर नुकसान झाले,सध्या जरी इयत्ता पहिली पासून शाळा सुरु झाल्या असल्या तरी अजूनही अंगणवाडीत मुलांना बोलवण्याची परवानगी न मिळाल्यामुळे हे जे नवीन दाखल होणारे विद्यार्थी यांनी अजून शाळा पाहिलेली नाही,जर जून महिन्यात डायरेक्ट पहिली इयत्तेत दाखल केले तर या मुलांना शाळेतील वातावरणात जुळवून घेण्यास वेळ लागणार आहे,परंतु एप्रिल महिन्यात जर या मुलांना शाळेत बोलावून त्यांचे स्वागत केले तर त्यांची शाळेविषयी असणारी भीती दूर होणार आहे हाच उद्देश या शाळा पूर्व तयारी मेळाव्याचा आहे,
दाखल पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत वेगवेगळ्या स्टॉल च्या माध्यमातून करण्यात आले,आणि खरोखरच या सातही स्टॉल वर मुलांना आवडतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खेळ,वस्तू,अनेक आकर्षक गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी हंडीनिमगाव ग्रामपंचायत सदस्य सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य,केंद्रातील अधिकारी सर्व शिक्षक,पालकवर्ग,विद्यार्थी ,ग्रामस्थ,अंगणवाडी ताई,आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणारे,हंडीनिमगाव जी.प.शाळा येथील मुख्याध्यापक व शिक्षक सर्व मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे