दु:खाचा ङोंगर बाजुला सावरुन आमदार तूषार राठोङ शेतकर्याच्या बांधावर..!
प्रतिनिधी एम बी कवठेकर
नांदेङ प्रतिनिधी।स्वतःच्या कुटूंबावर डोंगराएवढे कोसळलेले दु:ख बाजूला सारून आमदार डॉ.तुषार राठोड यांनी अतिवृष्टी ग्रस्त भागाची केली पाहणी व आणि दिला शेतकरी बळीराज्याला दिलासा….
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावाला आ. डॉक्टर तुषार राठोड यांनी भेटी देत नुकसानग्रस्त शेतीची घरांची रस्त्यांची पाहणी केली..
दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजीअतिवृष्टी मध्ये मुखेड येथे नदीला आलेला पूरातून वाहन जात असताना सख्खे चुलत भाऊ व पुतण्या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेला काही दिवसाचा दिवसाचा कालावधी झाला असताना सर्व दुःख ठेवून आ.डॉ. तुषार राठोड यांनी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जाऊन आज कंधार तालुक्यातील गुंटूर, दिग्रस बु, दिग्रस खु,उमरगा खो ,हाडोळी ब्र, मरशिवणी,मोहीजा,वाहद कुरूळा अंबुलगा बोरी बु ,मंगनाळी ,कळकावाडी, देवयाचीवाडी,पेठवडज शिर्शी बु शिर्शी खु जाकापूर, गोणार, मसलगा मादाळी येलूर,नारनाळीआदी गावात भेटी दिल्या. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे योग्य रीतीने सर्वेक्षण करण्याबाबत व नुकसानग्रस्त कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिल्या.यावेळी कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पांपटवार , महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे उप अभियंता जाधव ,गट विकास अधिकारी मांजरमकर, मंडळ अधिकारी पटणे , मंडळ कृषी अधिकारी विकास नारनाळीकर,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह अधिकारी कर्मचारी व गावातील मंडळींचीउपस्थिती होती. पंजाबराव पाटील ,देविदास राठोड, मारुती गवळी, भगवान पाटील ,शिंदे पाटील,जाधव,केंद्रे यांची उपस्थिती होती.