दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

खाजगी अवैध वाहतुक करणा-यांवर कारवाई करावी- आगार व्यवस्थापक व एस. टी. कामगारांची मागणी

प्रतिनिधी गणेश गायकवाड

पाटस प्रतिनिधी। दि. २२ सप्टेंबर, २०२१ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दौंड आगारामार्फत चालवण्यात येणा-या फे-या गोलराऊंड येथून चालवील्या जातात त्या ठिकाणी कुरकुंभ, बारामती, फलटण जाणा-या प्रवाशांची गर्दी खुप मोठया प्रमाणात असते त्या ठिकाणीच मोठया प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक केली जाते. त्यामुळे रा. प. महामंडळाचे प्रवाशी उत्पन्न बुडत असून राज्य शासनाचा महसूल देखिल बुडत आहे. गोलराऊंड येथे प्रवाशी निवारा बसस्थानक देखिल आहे. सदरील ठिकाणी बसस्थानकाच्या समोर व आजुबाजूला सर्व खाजगी वाहतुक करणारे तीन चाकी, चार चाकी रिक्षा / टमटम / जीप अशा अनेक प्रकारच्या गाडया लावल्या जातात त्यामुळे रा.प. बस आली असता प्रवाशी चढ-उतार करण्यासाठी व पंधरा मिनीटे, अर्धातास हॉल्ट असल्यामुळे बस लावण्यासाठी जागा मिळत नाही अशा चालक व वाहकांच्या व प्रवाशांच्या वारंवार तक्रारी आगार व्यवस्थापक यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत तसेच खाजगी वाहतूक करणा-यांना गाडया बाजूला लावण्याची विनंती करुनदेखिल ऐकत नाहीत, त्यामुळे ट्राफीक जॅम होत असते ट्राफीक जॅम झाल्यामुळे बसमध्ये ७-८ प्रवाशी असलेतरीदेखिल व नियोजीत वेळेपूर्वीच बस मार्गस्थ करावी लागते त्यामुळे रा.प. महामंडळाचे हजारो रुपयाचे प्रवाशी उत्पन्न व राज्य शासनाचा महसुल बुडून आर्थिक नुकसान होत आहे व प्रवाशांची गैरसोय झाल्यामुळे तक्रारी उदभवत आहेत.
खाजगी वाहतूकदारांकडून नेहमी चालक व वाहकांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. वादविवाद व शिवीगाळ केल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत त्यामुळे कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यामुळे इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 103 कामगारांच्या सहयांचे निवेदन आगार व्यवस्थापक दौंड, पोलीस अधिक्षक कार्यालय पुणे, मा. विभाग नियंत्रक पुणे, मा. परिवहनमंत्री अनिल परब साहेब, मा. गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब मुंबई, मा. महाव्यवस्थापक मुंबई, यांना निवेदन देण्यात आले आहे. त्या निवेदनामध्ये खाजगी वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कामगारांच्या निवेदनाची दखल घेऊन मा. आगार व्यवस्थापक श्री. रामनाथ मगर यांनी पोलिस निरीक्षक श्री. विनोद घुगे साहेबांची समक्ष भेट घेऊन पत्र दिले व कारवाईची मागणी केली. मा. विनोद घुगे साहेबांनी त्वरीत कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
यापुर्वीही अनेक वेळा आगार व्यवस्थापक व दौंड पोलिस स्टेशनला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे परंतु अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर अनुचीत प्रकार घडल्यास व निवेदनाची दखल न घेतल्यास कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे