दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

आबासाहेबांनी आपल्या आयुष्यात विदुराची भूमिका बजावली….

प्रतिनिधी।शामराव काळपुंड

शेवगाव प्रतिनिधी।ढोरजळगाव येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आबासाहेब काकडे यांचे 43 वे पुण्यस्मरण साजरे झाले. यावेळी श्री अनंत कुलकर्णी लिखित ‘न्याय हा परमेश्वराचा’ या आबासाहेबांच्या जीवनावरील चरित्र ग्रंथाचे प्रकाशन माननीय अशोकराव चेमटे( विशेष कार्य अधिकारी माननीय मंत्री पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय,मुंबई ) यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षीय मनोगतात श्री अशोकराव चेमटे म्हणाले, की कॉम्रेड आबासाहेब काकडे यांना प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल आत्मीयता होती.
लेखक, श्री अनंत कुलकर्णी यांनी सांगितले, की आबासाहेबांनी आपल्या आयुष्यात विदुराची भूमिका बजावली. महाभारतातील विदुर हे नेहमी सत्याच्या न्यायाच्या बाजूने म्हणजेच पांडवाच्या बाजूने होते. तसेच आबासाहेब देखील न्यायाच्या बाजूने होते. आबासाहेबांनी आयुष्यात कोणालाही काही मागितले नाही.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, सौ. हर्षदाताई काकडे यांनी सांगितले, की आबासाहेबांचे शाश्वत विचार घेऊन मी व शिवाजीराव काकडेसाहेब पुढची वाटचाल करत आहोत. आबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले कोपरे धरणाचे स्वप्न सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू.
माननीय श्री. प्रमोदजी लांडे(उद्योग संचालक, संगमनेर) यांनी सांगितले ,की शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक सर्वात मोठी आहे. श्री. राजाजी बुधवंत यांनी आबासाहेबांनी रंजल्या गांजल्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. शशिकाका कुलकर्णी यांनी आबासाहेबांच्या सहवासातील अनुभव सांगितले.
यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, माननीय श्री.शिवाजीराव काकडेसाहेब , श्री. शिवनाथजी देवढे, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, आरोग्य विस्तार अधिकारी, सुरेशराव पाटेकर,बापूसाहेब पाटेकर, डॉ. सुधाकर लांडे, सरपंच ,रघुवीर उगले, सरपंच, शाहादेव खोसे, अनंता उकिर्डे, गणेश कराड, विक्रमराव उकिर्डे, भिवसेन केदार, ज्ञानेश्‍वर उगले,विष्णूपंत गरड, पांडुरंग सांगळे, संदीप वाणी, रज्जाकभाई शेख, पत्रकार शहादेव वाकडे, उदय बुधवंत, रमेश भालसिंग, मोतीराम काळे,भाऊसाहेब भालसिंग, किशोर गाडगे, नूतन अल्हाट, देवदान अल्हाट, म्हातारदेव आव्हाड, सुरेशराव आव्हाड,अशोक आव्हाड, .मारुती पांढरे, श्री राजू पुंडेकर, ह. भ. प. केशव महाराज, देवीदास पाटेकर, विश्वास जायभाये, पांडुरंग गरड, देवीदास गिरे,रोहन साबळे, रविंद्र राशिनकर, आसाराम शेळके, ॲड. गोरक्षनाथ जमधडे , जयकुमार देशमुख, संभाजी फसले ,भगवानराव गरड, अनिलराव नागरगोजे, मुरलीधर देशमुख, संदीप बडे, संभाजी लांडे, गणेश पाटेकर,महादेव पाटेकर, सुभाष दिवटे,भारत भालेराव, बाळासाहेब कराड, डॉ. नामदेवराव दौंड व पंचक्रोशीतील पदाधिकारी,प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य, कांतेश्वर ढोले यांनी केले. उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक, सुनीलराव आव्हाड यांनी मानले. सूत्रसंचालन, मंजुश्री बुधवंत, सुरेश तेलोरे, सचिन कुलकर्णी यांनी केले. यावेळी अनाथ मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे