दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

नांदेड महावितरणच्या नांदेड परिमंडळांतर्गत 975 वीजचोरांना महावितरणचा दणका..!

प्रतिनिधी।एम बी कवठेकर

नांदेड प्रतिनिधी।महावितरणच्या नांदेड परिमंडळांतर्गत वीजचोरांविरोधात राबविलेल्या मोहिमेत गेल्या चार महिन्यात तब्ब्ल 975 वीजचोरांना महावितरणने दणका दिला आहे. यापैकी 371 वीजचोरांकडून 81 लाख 58 हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे. तर बील न भरणाऱ्या वीजचोरांवर विद्युत कायदा 2003 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा घालून कंपनीचे होणारे मोठे अर्थीक नुकसान टाळण्याच्या हेतुने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी जून 2021 पासुन वीजचोरां विरोधात आक्रमकपणे मोहिम राबवली आहे. गेल्या चार महिण्याच्या कालावधीत नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयातील 975 वीजचोरांचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले आहे.
या धडाकेबाज कारवाईत आकडे टाकून वीज चोरी करणारे , मीटर मध्ये छेडछाड करून वीजचोरी करणारे, पिङी मिटर तसेच घरगुती, व्यवसाईक वापर चोरी करणारे मिटर रिङींग बद जास्त युनिटचा वापर करुन कमी युनिट तसेच बंद युनिट ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वीजबील थकबाकी असल्यामुळे तात्पुरता अथवा कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांचीही तपासणी या मोहीमेत करण्यात आली. कामात कुचराई करणार्‍या कर्मचारी यांचीही दखल घेण्यात आली या कारवाईत तब्बल 13 लाख 11 हजार 517 युनिट वीजेची चोरी झाल्याचे आढळून आले आहे.

या मोहिमेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पथके तयार करुन दिवस-रात्र आक्रमकपणे वीज चोरी शोधण्यात आली. या कारवाईत नांदेड जिल्हयातील 59 वीज चोरावर कलम 126 नुसार तर 451 वीज चोरावर कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये भोकर विभागातील 8 वीज चोरावर 126 नुसार तर 154 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली.
देगलूर विभागातील 8 वीज चोरावर 126 नुसार तर 46 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. नांदेड ग्रामिण विभागातील 5 वीज चोरावर 126 नुसार तर 53 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच नांदेड शहर विभागातील 11 वीजचोरावर 126 नुसार तर 198 वीजचोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर 159 वीज चोरांकडुन 42 लाख 20 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

परभणी जिल्हयातील 14 वीज चोरावर कलम 126 नुसार तर 167 वीज चोरावर कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये परभणी विभाग क्रमांक एक मधील 9 वीज चोरावर 126 नुसार तर 109 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. परभणी विभाग क्रमांक दोन मधील 5 वीज चोरावर 126 नुसार तर 58 वीज चोरावर कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. तर 64 वीज चोरांकडुन 16 लाख 16 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्याच बरोबर हिंगोली जिल्हयातील 21 वीज चोरावर कलम 126 नुसार तर 263 वीज चोरावर कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली. तर 148 वीज चोरांकडुन 23 लाख 22 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

“वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसा व रात्री केंव्हाही धाड टाकून वीज चोरा विरोधात कारवाई करत आहेत. मिटर बंद छेङछाङ. त्यामुळे वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच वीजेचा वापर करावा. वीज खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनी वीज पुरवठा दिल्यास त्यांच्यावरही वीज कायदयान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरांविरोधात प्रसंगी फौजदारी गुन्हे ही दाखल करण्यात येतील.” दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे