अहमदनगरऔरंगाबादक्रिडादेश-विदेशशिक्षण

विद्यानिकेतन मधे, संस्कार स्पोर्टस क्लबची बेल्ट परीक्षा उत्साहात्

विद्यानिकेतन मधे, संस्कार स्पोर्टस क्लबची बेल्ट परीक्षा उत्साहात्

नुकतीच 24 एप्रिल रोजी विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल श्रीरामपूर येथे संस्कार स्पोर्ट्स क्लब ची बेल्ट परीक्षा संपन्न झाली, या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत जवळजवळ 22 खेळाडू बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले . व कु.अनुष्का सत्रे, देव बाराहाते, सृष्टी आठरे, यशवर्धन देसाई, आदित्य पाटणकर या विद्यार्थ्यांना बेस्ट बेल्ट अवॉर्ड प्राप्त झाला.संस्कार स्पोर्ट्स क्लब गेल्या आठ वर्षापासून श्रीरामपूर मध्ये शिवकालीन खेळ, कराटे, तायक्वांडो, बॉक्सींग, मिक्स्ड मार्शल आर्ट इत्यादी प्रशिक्षण वर्ग चालवत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे सर यांनी भूषविले. खेळाडूंना घडवण्यासाठी पालकांची असणारी महत्वाची जबाबदारी, योग्य मार्गदर्शन कसे असावे , खेळाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून बघावे , इत्यादी विषयावर त्यांनी खेळाडूंना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन खावडीया , नरेंद्र कुदळे , प्रतीक शेळके , चंचल कुमार यादव ,राधिका खरात इत्यादींनी कष्ट घेतले. यशस्वी विद्यार्थ्याना संस्कार स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक व मुख्य प्रशीक्षक प्रवीण कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमाप्रसंगी हवालदार श्री प्रदीप साठे, रेल्वे पोलीस श्री तायडे, श्री आठरे, सर्व पालक इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व खेळाडूंचे श्रीरामपूर तालुका शिवसेना प्रमुख सचिन बडदे , विद्या निकेतन स्कूल प्राचार्य श्री विनोद रोहमारे सर , तानाजी पाटील सर, सोपान लाटे, करण नवले ( राष्ट्र सह्याद्री ),श्री सत्रे मेजर इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे