सातारा

ढवळेवाडी (आसू) येथील हनुमान विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर भाजपची एकहाती सत्ता

पस्तीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग; राजे गटाचा दारुण पराभव

सातारा  / अविनाश जाधव

फलटण तालुक्यातील ढवळेवाडी (आसू) येथील हनुमान विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर माता काळेश्वोरी विकास पॅनेलने सात जागा जिंकून राजे गटाच्या पॅनलचा दारुण पराभव केला आहे.

ढवळेवाडी (आसू) येथील हनुमान विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. भाजप पुरस्कृत खा. रणजितसिंह नाईक-निंंबांळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र रघुनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या माता काळेश्वोरी विकास पॅनेलने राजे गटाचा दारूण पराभव केला आहे. या सोसायटीवर गेल्या ३५ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते, मात्र या वर्षीच्या निवडणुकीत भाजपच्या नवख्या उमेदवारांनी दैदिप्यमान विजय मिळवून ३५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपच्या नवख्या उमेदवारांकडुन राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, ढवळेवाडी सोसायटीवर हरिश्चंद्र पवार यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार ज्ञानदेव विठ्ठल पवार, नेताजी शंकर पवार, राजाराम भाऊसो पवार, रामचंद्र महादेव पवार, सोपान भाऊसो पवार, सौ. अनुसया बुवासो पवार आणि संजय बबन माने निवडून आले आहेत. दरम्यान रुपेश पवार, अरविंद पवार, सोसायटीचे माजी चेअरमन संदीप उर्फ भूषण घोरपडे, ज्योतीराम फाळके, सूरज गाडे, दत्तात्रय साळुंखे, आनंद मोहिते, गणेश पवार, मच्छिंद्र पवार, भाऊसो घाडगे, संतोष कदम, महादेव ढोबळे, तानाजी वाघ, शंकर ढोबळे, गणेश गुळीक आदींनी माता काळेश्वोरी विकास पॅनेलच्या प्रचाराची धुरा सांभाळत विजय मिळवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.

“नागरिकांच्या सहकार्याचा आणि स्वच्छ कारभाराचा विजय”

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र पवार म्हणाले की, ढवळेवाडी (आसू) सोसायटीचा विजय हा गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्याचा आणि स्वच्छ कारभाराचा असून ही सोसायटी स्थापन झाल्यापासून विरोधी गटाची सत्ता होती, मात्र या वर्षी भाजपच्या नवनिर्वाचित संचालकांनी अपार कष्ट घेऊन सोसायटीवर सत्ता काबीज केली. यासाठी गावातील सामान्य व तरुण नवख्या उमेदवारांवर मतदारांनी विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार पवार यांनी मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे