सातारा

सचिन बोडरे यांची भाजपच्या भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या फलटण तालुका उपाध्यक्ष पदी निवड

सातारा / अविनाश जाधव

माढा मतदारसंघाचे भाजपचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि फलटण पूर्व भागाचे युवा नेते विशालसिंह माने-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आसू, ता. फलटण येथील सचिन बोडरे यांची भाजपच्या भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या फलटण तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ही निवड भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी बोलताना बजरंग गावडे म्हणाले की, भाजप ही पारदर्शक पार्टी असून कॉग्रेस राष्ट्रवादी सरकारने ६० वर्षात जेष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाहीत. परंतू भाजप सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी महात्मा फुले योजना आणली. शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भाजप सरकारने दिले. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी फक्त जनतेचा पैसा खायचे काम केले. त्यामुळे या नेत्यांच्या पाठीमागे ईडी लागत असल्याची टीका गावडे यांनी केली.

यावेळी भाजपचे फलटण पूर्व भागाचे युवा नेते विशालसिंह माने-पाटील, हरिश्चंद्र पवार, विठ्ठलराव माने-पाटील, आनंदराव माने-पाटील, माजी सरपंच राजेंद्र शिरतोडे, माढा लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक शरद झेंडे, भाजपचे तालुकापाध्यक्ष नितीन गोडसे-पाटील, भाजपचे ओ.बी.सी. मोर्चाचे तालुकापाध्यक्ष सुभाष येतकाळे, डॉ. संतोष जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गोफणे, धनंजय बोडरे, विश्वास नलवडे, राहुल रुपनवर, अखिल शेख, महेश गोफणे, सूरज गोफणे आदी भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे