चार राज्यांमध्ये भाजप सत्तेत आल्याने लोणी मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
प्रतिनिधी लखन गव्हाणे राहाता

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्याने लोणी मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. देशातील पाच राज्यात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने चार राज्यात प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहे . या विजयाचा जल्लोष लोणी कार्यकर्त्यांनी साजरा केला .लोणी भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा देऊन व फटाके फोडून आनंद व्यक्त केला .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपा सरकारला तेथील जनतेने पसंती दिली आहे . उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून अतिशय गुंडाराज व दहशत पसरवली जात होती ती मोडून काढण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यश आले.उत्तरप्रदेश मधील महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केले. यावेळी उपसरपंच गणेश विखे, डेपोटी अनिल नानासाहेब विखे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ विखे, भाऊसाहेब धावणे ,माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे,रवींद्र विखे, ॲडव्होकेट सुयोग विखे,माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल धावणे, गणेश विखे, नवनीत साबळे, गोरख दिवटे ,संतोष विखे, सुरेंद्र लगड,अनिल विखे, किशोर विखे, पंकज विखे,यांच्यासह लोणीतील अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती