
फलटण तालुक्यातील राजाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक झाली. या सोसायटीवर भाजप पुरस्कृत श्री जानाई ग्रामविकास पॅनलने राष्ट्रवादी कॉग्रेसचा धुव्वा उडवत पुन्हा एकदा एकहाती सत्ता स्थापन केली. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचे वडील व त्यानंतर माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले याच्या गटाची सत्ता असून या वर्षीही सर्वच्या सर्व १३ जागांवर या गटाने विजय मिळवला आहे.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले म्हणाले की, राजाळे सोसायटीचा विजय कै. जयवंतराव भोसले यांच्या सामाजिक कर्तुत्वाला समर्पित करीत असून, यासाठी भाजपचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगत मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही त्यांनी आभार मानले.
फलटण पूर्व भागात संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पॅनलला धुळ चारत एकहाती सत्ता काबीज केली आहे. या सोसायटीच्या विजयामुळे पूर्व भागातील इतर सोसायट्यांमध्ये देखील भाजपाचा वरचष्मा दिसत आहे.
भाजप पुरस्कृत या पॅनेल मधून दोनशे ते तीनशेच्यावर मताधिक्याने निवडून आलेले श्री. दिनकर जाधव, धनसिंग गणपतराव जाधव, बापू देशमुख, नीलकंठ बुवासो धुमाळ, भगवानराव बापूराव निंबाळकर, राहूल महादेव निंबाळकर, लालासो सर्जेराव भोईटे, रवींद्र शेडगे, पारुबाई शिवाजीराव पांढरे, बायडाबाई बुवासो सावंत, साधू चोपडे, संतोष बजरंग कुंभार आणि मागास प्रवर्ग मधून बिनविरोध निवड आलेले विलासराव भालेराव या उमेदवारांनी चांगली लढत देऊन श्री जानाई ग्रामविकास पॅनलला एकहाती सत्ता काबीज करून राजे गटाचा दारुण पराभव केला.