दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकीय

फलटण येथील टाकळवडे गावच्या सोसायटीवर भाजपची एकहाती सत्ता; राजे गटाचा दारुण पराभव

सातारा /प्रतिनिधी अविनाश जाधव

सातारा / प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील टाकळवडे येथील टाकळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत पद्मावती पॅनलने सर्व तेराच्या तेरा जागा जिंकून राजे गटाचा पॅनलचा दारुण पराभव केला आहे.

दरम्यान टाकळवडे येथील टाकळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. या सोसायटीवर भाजप पुरस्कृत खा. रणजितसिंह नाईक-निंंबांळकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पद्मावती पॅनलने राष्ट्रवादी कॉग्रेसचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता स्थापन केली. गेल्या २० वर्षांपासून माजी पंचायत समिती रदस्य पोपटराव इवरे यांच्या गटाची सत्ता असून या वर्षीही सर्वच्या सर्व १३ जागांवर या गटाने दैदिप्यमान विजय मिळवत राजे गटाचा दारून पराभव केला आहे. त्याबद्दल इवरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे आभार मानले.

दरम्यान, राजे गटाचे बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा माजी उपसरपंच कुमार शेडगे, सरपंच परिषदचे तालुकाध्यक्ष व सरपंच राहुल इवरे, सदस्य सहदेव मिंड, माजी चेअरमन बाळासो मुळीक या दिग्विजय नेत्यांचा भाजपच्या नवख्या उमेदवारांकडुन धक्कादायक पराभव झाल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

यावेळी बोलताना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासो इवरे म्हणाले की, टाकळवडे सोसायटीचा विजय हा माजी पंचायत समितीचे सदस्य पोपटराव इवरे व त्याच्या सहकार्याच्या स्वच्छ कारभाराचा आहे. सामान्य व तरुण नवख्या उमेदवारांवर मतदारांनी विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही आभार इवरे यांनी मानले. दरम्यान, टाकळवडे सोसायटीवर पोपटराव इवरे यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार रघुनाथ फुले २७१, रघुनाथ भोसले २७१, अजित मिंड २६२, सुरेखा जाधव २४२, अनुसाय मुळीक २६४, पोपटराव इवरे २६८, विकास इवरे २६०, नंदकुमार डांबे २४१, पोपट मिंड २४८, प्रकाश मिंड २४६, विकास मिंड २३७, धनाजी शिंदे २४६ आणि रंजित सांगळे २४१ मतांनी निवडून आले आहेत. पद्मावती पॅनलने एकहाती सत्ता काबीज करून राजे गटाचा १३-०० असा दारुण पराभव केला आहे. यावेळी पद्मावती पॅनल प्रचाराची धुरा संभाळत योग्य नियोजन करणारे नानासो इवरे, भारत मिंड, समीर गावडे, शहाजी इवरे, यशवंत मिंड, किसन मिंड, तुकाराम मिंड, शिवाजी मिंड, अमोल मुळीक, नानासो मिंड, बाळासो मिंड, दीपक फुले, शरद पवार, बापूराव मुळीक, शामराव गावडे, संतोष नलवडे, हरिभाऊ मिंड, गणेश भोसले,सागर जाधव, सुहास भोसले, नटराज माने, प्रशांत गावडे, संपत मिंड, संतोष डांबे, दत्तात्रय चव्हाण, सुनील मिंड, बापूराव खांडेकर, डॉ. राहुल फुले, सुखदेव फुले, दादासो मिंड, तानाजी शिंदे, राजेंद्र मिंड, भाऊसो मिंड, विनोद मिंड, सतिश इवरे ,संतोष नाझीकर, जनार्दन मुळीक, चारुदत्त राऊत, अजित इवरे, लालासो भोईटे, सागर जाधव, धनंजय दळवी, राजू शेख, युसुफ शेख, बकस मुलाणी आदींनी निवडणुकीसाठी प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे