दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरई-पेपरब्रेकिंग

नेवासा ब्रेकिंग ! पर्यावरणाला हानिकारक असलेले जिवंत दीड टन मांगूर मासे पोलिसांनी पकडले

दैनिक देशरत्न प्रतिनिधी मयुर शहाजी मांडलिक

नेवासा प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):- नेवासा प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात शासनाने बंदी घातलेले दीड टन वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे मांगूर जातीचे मासे व पिकअप नेवासा पोलिसांनी गिडेगाव शिवारातून जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोकॉ /रामचंद्र पांडुरंग वैद्य यांनी फिर्याद दिली आहे.३ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याचे सुमारास नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे पिकअपचा चालक अमोल सुदाम म्हस्के (वय २८) रा.गोगलगाव ता. नेवासा तसेच शालीद मंगलभीम गायकवाड (वय २१,रा.गारखेडा ता.जामनेर जिल्हा जळगाव) हे दोघे आपल्या ताब्यातील पिकअप जीप (एमएच १७ एजे ६५७५) मध्ये मागील भागात ताडपत्रीमध्ये असलेले पाणी व त्यातील अंदाजे दिड टन वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगूर जातीचे जिवंत मासे १५० रुपये किलो दराचे एकूण किंमत तीन लाख रुपये एक पांढर्‍या रंगाची पिकअप जीप अंदाजे ५ लाख २५ हजार रुपये जप्त करण्यात आले असून दोघांवर भादंवीक १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे