दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

रोडचं नारळ फुटलं, ना गुलाल,ना फावडं, ना कुदळ पण शरय मात्र आम्हाला द्या !!!

रोडचं नारळ फुटलं, ना गुलाल, ना फावडं, कुदळ. पण शरय मात्र आम्हाला द्या !!!
श्री अवधूत खाडे
प्रतिनिधी,
मौजे नाव्हा ते तामसा या रोडचे काम दिनांक, 28/10/2022 रोजी सुरू झाले पण आज दिनांक ,: 29/10/2022 रोज शनिवार रोजी माननीय तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे तामसा मार्केटला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते, पण काही सुज्ञ कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की नाव्हा रोडचं नारळ फोडायच. ते जनतेचे नेते असल्यामुळे त्यांनी नाकार नाही दिला, फोडलं नारळ !
पण त्या सुज्ञ कार्यकर्त्यांना तरी समजायला पाहिजे होतं की नाव्हा गावचा रोडचं काम कालच सुरू झाले आज आपण आमदार साहेबाला आणून त्याचा अपमान तर करत नाही ना ?
बर हे असं मग दिला एक नारळ फोडण्याच्या आधी तिथे गुलाल तरी आणावा लागेल, एखादी कुदळ पाहिजे, एकांदा फावडा असायला पाहिजे, ज्या रोडचा ठेकेदार तिथे असायला पाहिजे, खोदकामाची पूजा व्हायला पाहिजे, असं काही झालं नाही,
एक किराणा दुकानातून सतरा रुपयाचा नारळ आणला साहेबांच्या हातात दिला साहेब म्हणले कुठे फोडू सांगा, साहेबाला रोड दाखवला साहेबांनी नारळ फोडला पण याची गावभर चर्चा आमच्या सांगण्यावरून साहेबांना नाव्हा गावचा रोडचे भूमिपूजन करून आज कामाला सुरुवात केली.
कितपत श्रेय घेण्यासाठी थरावर जाणार आहात!!
अशी चर्चा नाव्हा येथील रहिवाशांमध्ये होत आहे मग हा नारळ प्रसिद्धीसाठी फोडला का साहेबाचा अपमान व्हावा म्हणून हे ही समजत नाही. हे सुज्ञ कार्यकर्तेच करू शकतात असं मत शनिवार बाजारात आलेल्या गावकऱ्यांकडून ऐकायला मिळत होतं.
त्यांच्यात अशी ही चर्चा होत होती की गावचा रोड हा किती टक्के चांगला करून घेतात हे माहित नाही आणि निघाले मी केलं म्हणायला..
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे