दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग
Trending

पोटा येथे विद्येची देवता सरस्वती देवीची मोठ्या उत्साहात प्राण प्रतिष्ठापणा……….

हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथे 26 जानेवारी रोज गुरुवारी विद्येची देवता माता सरस्वती देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने होणार असून त्या कार्यक्रमानिमित्ताने पोटा बु व पोटा परिसरातील भाविक भक्तासाठी नगरभोजन महाप्रसादाचे आयोजन केले आहे.माता सरस्वती देवीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पोटा नगरीचे सुपुत्र दिगंबरराव देविदासराव माने देशमुख व त्यांचे सुपुत्र डॉक्टर विठ्ठलराव दिगंबरराव माने देशमुख यांनी स्वखर्चातून लाखो रुपये मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या तिजोरीतून खर्च केले असल्याने माने देशमुख यांनी भव्यदिव्य माता सरस्वती देवीचे पोटा गावात मंदिर उभारले आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26जानेवारी 2023 रोजी पाच ब्राह्मणना निमंत्रित केले आहे त्यांच्या हासते हिंदू धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे ‌होम यज्ञ हवन करून माता सरस्वती देवीची प्राणप्रतिष्ठापना मूर्ती स्थापन होणार आहे या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून नगर भोजन महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान डॉक्टर विठ्ठलराव दिगंबरराव माने देशमुख यांनी केले आहे.पोटा नगरीमध्येआतापर्यंत एकंदरीत चार मंदिराची बांधकाम केल्याचे समोर येत आहे पहिले मंदिर तुकामाईचे दुसरे मंदिर गणेशाचे तिसरे मंदिर दत्तप्रभूचे कलशारोहणआणि चौथी मंदिर उद्याच्या कार्यक्रमाची आपणआतुरतेने वाट पाहतो अशी ती देवी माता सरस्वती तिच्या मंदिरासाठी लाखो रुपये खर्चून स्व कष्टाने कमावलेल्या तिजोरीतून माता सरस्वती देवीच्या मंदिराच्या बांधकामासाठी उधार अंतःकरणाने मोठ्या मनाने पैसे खर्च करून भव्य दिव्य असं मंदिर उभारले आहे ‌त्याबद्दल पोटा गावातील व पोटा बु.परिसरातील भाविक भक्तांनी दिगंबरराव माने देशमुख व त्यांचे सुपुत्र डॉक्टर विठ्ठलराव दिगंबरराव माने देशमुख यांचे सर्व स्तरावूनअभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

प्रभु साहेबराव कदम वाघीकर दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी

दैनिक देशरत्न न्युज पत्रकार प्रभू कदम वाघीकर बातम्या देण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्स ॲप मेसेज करा +918411985876

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे